cApStAn Linguistic Quality Assurance

चाचणीचा अनुवाद

सर्वेक्षणाचा अनुवाद

सांस्कृतिक स्वीकृती

भाषेच्या गुणवत्तेची हमी

95 भाषा

270 भाषा आवृत्त्या

122 देश

670 दशलक्ष शब्दांवर प्रक्रिया पूर्ण

आमच्याबाबत

cApStAn आंतरराष्ट्रीय किंवा बहुप्रादेशिक प्रकल्पांमध्ये भाषेच्या घटकाचे व्यवस्थापन पाहतेः यामध्ये मूळ मजकुराचे विश्लेषण करणे, शब्दावली तयार करणे आणि अनुवाद टीमांचे प्रशिक्षण समाविष्ट आहे-हे सर्व अनुवादाची सुरुवात होण्यापूर्वी केले जाते-अखेर गरजेनुसार योग्य असलेला पडताळून पाहिलेला अनुवाद करुन दिला जातो.

युरोप आणि अमेरिकेतील आमच्या भाषा सेवांसाठी आम्ही अतुलनीय प्रतिष्ठा कमावली आहे, आणि ऑस्ट्रेलिया, आशिया आणि आफ्रिकेमध्ये आमचे नियमित ग्राहक आहेत.

22 तज्ञांच्या (17 देशांमधील) बहुसांस्कृतिक मध्यवर्ती टिमखेरीज, cApStAn भाषातज्ञांच्या एका नेटवर्कला प्रशिक्षण देते आणि समन्वित करते जे या व्यवसायातील सर्वोत्तम लोकांपैकी आहेतः सर्व अनुभवी अनुवादक आणि/किंवा शिक्षक आहेत; सर्वांकडे एक किंवा अनेक उच्च शिक्षण पदव्या आहेत, ज्या बहुतांशी भाषा विज्ञान, अनुवाद, समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र किंवा शैक्षणिक विज्ञानातील आहेत. 700 हून अधिक भाषा तज्ञ आणि विद्वान (110 राष्ट्रीयत्व आणि 70 देशांमधून) सध्या cApStAn सोबत कंत्राटावर आहेत आणि सुदूर पद्धतीने काम करतात.

ब्रसेल्स (बेल्जियम) आणि फिलाडेल्फिया (युएसए) मधील कार्यालये, आता भारतामध्ये एक सल्लागार

आमचे कार्यक्षेत्र

मार्गदर्शन

GUIDE

आमच्या कामाची सुरुवात अनुवाद प्रक्रियेच्या बरीच आधीपासून होते.

अनुवाद गुणवत्तेचे सर्वोच्च मानदंड पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्रकल्पाच्या सर्वात आरंभिक टप्प्यांमध्ये एक cApStAn भाषा तज्ञाचा समाविष्ट करा.

अनुवाद

TRANSLATE

आपण एखाद्या प्रश्नावलीचा अनुवाद कसा करता? आपण एखादी चाचणी कशी अंगिकारता?

cApStAn खात्री करेल की आपले अनुवादित मूल्यांकन चाचणी किंवा सर्वेक्षण विश्वासार्ह असेल आणि तुलनात्मक डाटा संकलित करेल. आम्ही 100 हून अधिक भाषांमध्ये कुशल अनुवाद सेवा पुरवितो.

प्रमाणीकरण

CERTIFY

cApStAn ची स्थापना मई 2000 मध्ये झाली तेव्हा, तिसऱ्या पक्षांनी तयार केलेले अनुवाद तपासणे आणि वैध करणे हे तिचे मुख्य काम होते. संस्थापकांनी त्यांचा अनुभव PISA कडून आणला.

वीस वर्षांनंतर, cApStAn व्यापक प्रमाणातील अनुवाद गुणवत्ता मूल्यांकन पद्धती आणि अहवाल सुविधा देते.

सामायिकरण

SHARE

International Test Commission (ITC) Guidelines for Translating and Adapting Tests मध्ये वर्णन केलेल्या चांगल्या प्रथांचा आम्ही वापर करतो.

आम्ही चांगल्या प्रथा मोठ्या प्रमाणावर तपासून देखील पाहतो, त्यांच्यामध्ये सुधारणा करतो, आणि नंतर त्यांचा प्रसार आणि प्रचार करतो.

कोणत्या क्षेत्रामध्ये

ज्ञान आणि कौशल्ये

शिक्षणामध्ये, प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण कार्यक्रम, ज्ञान आणि कौशल्ये, बरेचदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोजावी लागतात.

सामाजिक आणि वृत्तीदर्शक सर्वेक्षणे

समाजाला समजून घेण्यासाठी सु-रचित सर्वेक्षणांची आवश्यकता असते. सामाजिक आणि वृत्तीदर्शक सर्वेक्षणांद्वारे संकलित डाटामुळे अनेक भागिदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यात मदत मिळते.

बाजारपेठेचे संशोधन

बहुप्रादेशिक आणि बहुसांस्कृतिक संदर्भांमध्ये, सर्वेक्षणांचा अनुवाद आणि अंगिकार करताना ग्राहकांचा अनुभव जाणून घेण्यासाठी विविध सांस्कृतिक समर्पकतेवर लक्ष केंद्रित केले जाते.

मतांचा कौल

मतांच्या कौलाद्वारे उद्दिष्टित लोकसंख्येची नाडी जाणून घेता येते. घटना किंवा प्रसंगांचा अंदाज ते व्यक्त करतात किंवा लोकांच्या प्रतिक्रिया मापतात.

प्रज्ञा व्यवस्थापन

मनुष्यबळ कौशल्यांचा अंदाज, नोकरीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणारे किंवा वैश्विक स्तरावर व्यवस्थापनाच्या कामगिरीचे मापन करणारी मूल्यांकने उच्च दर्जाची साधने असतात.

स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संघटना

आंतरराष्ट्रीय संघटना आणि स्वयंसेवी संस्थांच्या संवादाच्या विशिष्ट गरजा असतात, त्यामध्ये सांस्कृतिक दृष्टिने भिन्न असतील अशा समूहांना संवेदनशील मजकूर पुरविणे समाविष्ट असते.

ग्राहक आणि भागीदार